लसीकरण केंद्रावरच नोंदणी करण्याची सेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:41+5:302021-05-12T04:18:41+5:30
लसीकरणासाठी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन स्वतः नोंदणी करण्याचे अनिवार्य आहे. यामुळे बाळापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांची नोंदणी होत नसून, तालुक्याच्या बाहेरील ...
लसीकरणासाठी दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन स्वतः नोंदणी करण्याचे अनिवार्य आहे. यामुळे बाळापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांची नोंदणी होत नसून, तालुक्याच्या बाहेरील अकोला, अकोट, नागपूर आदी ठिकाणचे नागरिक ऑनलाइन नोंदणी करून लसीकरण करून घेत आहेत. दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत लसीकरण केंद्र नोंदणी पूर्ण होत आहे, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांजवळ स्मार्ट मोबाइल नसणे, ग्रामीण भागात नेटवर्क नसणे किंवा नोंदणी कशी करावी, हे समजत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख आनंद बनचरे, माजी तालुका प्रमुख उमेशअप्पा भुसारी, दिलीप ठाकूर, गणेश भिसे आदी उपस्थित होते.