लष्कराच्या जवानाने केला तरुणीवर बलात्कार

By admin | Published: June 27, 2016 02:37 AM2016-06-27T02:37:23+5:302016-06-27T02:37:23+5:30

मूर्तिजापूरनजीक तूरखेडमधील घटना; जवान व त्याच्या आईविरूद्ध गुन्हा दाखल.

Army rape rape rape victim | लष्कराच्या जवानाने केला तरुणीवर बलात्कार

लष्कराच्या जवानाने केला तरुणीवर बलात्कार

Next

मूर्तिजापूर (जि. अकोला): तुरखेडस्थित एका पॉलिटेक्निकमध्ये शिकणार्‍या एका २0 वर्षीय तरुणीला लष्करातील एका जवानाने पेपरच्या दिवशीच फूस लावून पळवून नेऊन सोनोरी शिवारात तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १६ जूनला रात्री ८ वाजताच्या घडली होती. त्याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी २२ जूनला सदर जवानाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर तरुणी मूळची वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पिंपळा येथील असून, ती तुरखेड येथे शिक्षण घेत आहे. १६ जून रोजी पीडित मुलीने पेपर दिल्यावर वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील आरोपी विशाल गौतम भालेराव (२५), आई सुनीता गौतम भालेराव यांनी मुलीला मूर्तिजापुरात गाठले. तिला तुझ्या वडिलांसोबत भेटून लग्नाच्या गोष्टी करू, अशी भूलथाप देऊन मोटारसायकलवर फूस लावून पळवून नेले. अकोला-मूर्तिजापूरदरम्यान सोनोरी शिवारात रात्री ८ वाजताच्या दरम्यान आईला शौचाच्या कारणाने बाजूला पाठविण्यात आले. त्यानंतर एका पडक्या घराच्या आडोशाला पीडित मुलीला नेऊन जबरी संभोग केला, अशी तक्रार पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितली. आरोपीच्या वडिलांनी, तुझे लग्न करून देतो, पोलिसात तक्रार करू नको, अशी विनंती केली होती; मात्र शेवटी पीडितेला लग्न करून देण्यासाठी नकार मिळाल्याने पीडितेने २२ जूनला मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार नोंदविली. आरोपी विशाल गौतम भालेराव (२५) हा जम्मू काश्मीर येथे लष्करी सेवेत आहे. ग्रामीण पोलिसांनी आरोपी विशाल भालेराव व त्याची आई सुनीता भालेरावविरुद्ध भादंविच्या ३६३, ३६६, ३७६, ५0६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रतापसिंग सोळंके, पोकाँ. नितीन चुडे करीत आहेत.

Web Title: Army rape rape rape victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.