अतिक्रमकांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था; महापौरांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:50 PM2018-10-27T12:50:32+5:302018-10-27T12:50:42+5:30
रस्त्याच्या मधोमध दुकान थाटणाºया अतिक्रमकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना दिले.
अकोला: मुख्य रस्त्यांलगत बाजार मांडणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांमुळे संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून, सर्वसामान्य अकोलेकरांना रस्त्यावरून पायी चालणे मुश्कील झाले आहे. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता चक्क रस्त्याच्या मधोमध दुकान थाटणाºया अतिक्रमकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना दिले.
अवघ्या अकरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी आतापासूनच बाजारपेठमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र आहे. शहरातील अतिक्रमणाच्या समस्येचा अकोलेकरांना पुरता वैताग आला आहे. दिवाळीच्या दिवसांत चक्क रस्त्याच्या मधोमध किरकोळ विके्रता, लघू व्यावसायिक व फेरीवाले बाजार मांडतात. त्यामुळे मुख्य बाजारपेठमध्ये अक्षरश: जाम होत असल्याचे चित्र दरवर्षी पाहावयास मिळते. बाहेरगावातून आलेले गोरगरीब विके्रते दोन दिवसांकरिता लक्ष्मी मूर्ती, पणत्या, दिवे, बत्तासे तसेच पूजा साहित्याची दुकाने सजवितात. वाहतुकीला अडथळा होत असल्याने त्यांच्यावर नाइलाजाने कारवाई करावी लागते. हा प्रकार थांबविण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी दालनात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमकांना किमान दिवाळीच्या दिवसांत तात्पुरती व्यवस्था म्हणून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. बैठकीला उपायुक्त सुमंत मोरे, नगररचनाकार संजय पवार, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, स्वच्छता विभागाचे अधीक्षक प्रशांत राजूरकर, विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे, बाजार विभाग प्रमुख संजय खराटे आदी उपस्थित होते.
या ठिकाणी होणार पर्यायी व्यवस्था!
* जनता भाजी बाजारालगतच्या मुंगीलाल बाजोरिया मैदानावर पूजा साहित्य, पणती, दिवे, फुले-पाने आदींची विक्रीसाठी दुकाने
* भाटे क्लबलगतच्या मैदानात फुलांची विक्री करणाºया व्यावसायिकांची दुकाने
* सिटी कोतवालीलगतच्या मोर्णा नदीच्या गणेश घाटावर रेडीमेड कापड विके्रत्यांची दुकाने
* उपरोक्त सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था, स्वच्छतेची सुविधा निर्माण केली जाईल.
...तर साहित्य जप्त करा!
मनपाने निश्चित केलेल्या जागेवर दुकाने न उभारता रस्त्यावर अतिक्रमण केल्यास संबंधितांचे साहित्य जप्त करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. जागेसंदर्भात काही शंका-कुशंक ा असतील, तर संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
झोननिहाय जागा शोधा!
दिवाळीनिमित्त पूजेच्या साहित्यासह विविध साहित्यांची विक्री करण्यासाठी लघू व्यावसायिकांना झोननिहाय जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जागेची तपासणी करून त्याची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले.