मुलांसह रेल्वेतून उडी घेणार्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:23 AM2017-10-07T02:23:35+5:302017-10-07T02:26:55+5:30
अकोला : एका महिलेने चिमुकल्या मुलांसह रेल्वेगाडीतून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. नागपूर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अकोला रेल्वे पोलिसांनी महिलेला अटक केली. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती शहरातील संजय गांधी नगरात राहणारी आम्रपाली सुनील बनसोड (३0), प्रियंका बनसोड (२) आणि प्रथमेश बनसोड (३) हे तिघे माय-लेक १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुरूम ते माना रेल्वे स्टेशनदरम्यान लोहमार्गावर जखमी अवस्थेत पडून असल्याचे बडनेर्याहून अकोल्याकडे जाणार्या मालगाडीच्या चालकाला दिसले. त्यांनी तातडीने ही माहिती माना रेल्वे स्टेशन मास्टरला दिली. स्टेशन मास्टर यांनी बडनेरा रेल्वे पोलिसांच्या मदतीने जखमी अवस्थेतील माय-लेकांना भुसावळ ते नागपूर पॅसेंजर रेल्वेगाडीने बडनेरा येथे रवाना केले. तेथून रेल्वे पोलिसांनी जखमी विवाहिता व तिच्या मुलांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले; परंतु तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने, रेल्वे पोलिसांनी त्यांना नागपुरातील रुग्णालयात हलविले. या प्रकरणात अकोला रेल्वे पोलिसांनी महिलेविरुद्ध भादंवि कलम ३0७ व ३0९ नुसार गुन्हा दाखल केला. या तिघाही जणांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. अकोला रेल्वे पोलिसांनी नागपूर येथून महिलेला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले. तिच्याकडून बाजू मांडणार्या विधिज्ञांनी न्यायालयाकडे ही महिला मानसिक रोगी असून, तिला जामीन देण्याची मागणी केली; परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत, तिला कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. जखमी मुलांना वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.