साेने व कार चाेरणाऱ्या आराेपीस मीरजमधून अटक

By सचिन राऊत | Published: December 17, 2023 12:57 PM2023-12-17T12:57:57+5:302023-12-17T13:02:39+5:30

स्थानीक गुन्हे शाखेची माेठी कारवाइ, १३ ताेळे साेन्यासह १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Arrested from Meeraj for car and car theft | साेने व कार चाेरणाऱ्या आराेपीस मीरजमधून अटक

साेने व कार चाेरणाऱ्या आराेपीस मीरजमधून अटक

अकाेला : गीता नगर परिसरात असलेल्या महेश काॅलनीतील एका फलॅटमधून साेन्याच्या दागीन्यांसह कार चाेरी करणाऱ्या आराेपीस स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्याकडून कार व चाेरी केलेले १३ ताेळे साेने जप्त करण्यात स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची कींमत सुमारे १८ लाख रुपये असल्याची माहीती स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शंकर शेळके यांनी दिली.

महेश काॅलनी येथील रहीवासी नीलेश नंदकीशाेर राठी वय ४५ वर्ष यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेल्यानंतर ते दुकानावर असतांना त्यांच्या निवासस्थानातून २९ नाेव्हेंबर राेजी अज्ञात चाेरटयांनी साेन्याच्या दागीन्यांसह राेखरक्कम व मुद्देमाल लंपास केला हाेता. या प्रकरणी जुने शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी अज्ञात चाेरटयांविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. या प्रकरणाचा तपास स्थानीक गुन्हे शाखेनेही सुरु केला असता मीळालेल्या माहीतीवरुन सांगली जिल्हयातील मीरज येथील रहीवासी अरुण वंसत पाटील यास ताब्यत घेतले. त्याची कसून चाैकशी केली असता आराेपीने या चाेरीत सहभाग असल्याची कबुली स्थानीक गुन्हे शाखा पाेलिसांसमाेर दिली. या चाेरटयाकडून १३ ताेळे साेन्याचे दागीने, कार व मुद्देमाल असा एकून १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख शंकर शेळके यांच्यासह त्यांनी स्थापन केलेल्या पथकाचे प्रमूख गाेपाल जाधव, वसीमाेद्दीन शेख, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, एजाज अहेमद यांनी केली.

मुख्य सुत्रधार अद्यापही फरार

या चाेरी प्रकरणातील मुख्य सुत्रधार लाेकेश सुतार हा अद्यापही फरार असल्याची माहीती आहे. सुतार हा आंतरराज्यीय टाेळीचा म्हाेरक्या असून त्याने कर्णाटकसह विविध राज्य व पुणे, बारामती, सांगली, साेलापूर, काेल्हापूर, मीरज या ठिकाणीही चाेऱ्या केल्याची माहीती पाेलिस सुत्रांकडून मीळाली. सुतार याच्याविरुध्द जबरी चाेरी, घरफाेडी, लुटमार, दराेडयासह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहीती आहे.

Web Title: Arrested from Meeraj for car and car theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.