वेदनंदिनी अपघातप्रकरणी व्यवस्थापकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 02:20 AM2016-06-10T02:20:57+5:302016-06-10T02:20:57+5:30
कृषी पर्यटन केंद्रावर बालकाचा ८ जून रोजी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.
बाश्रीटाकळी (अकोला): कान्हेरी सरप येथील वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्रातील अपघातप्रकरणी पोलिसांनी येथील व्यवस्थापक मेहर कुमार याला आज ९ जून रोजी अटक केली आहे.
बाश्रीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्रावर कुटुंबीयांसह आलेल्या निशांत चोपडे (१४ ) या बालकाचा ८ जून रोजी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. यानंतर मृतक निशांतचे मामा अरुण सरोदे यांनी आज ९ जून रोजी बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात पर्यटन केंद्राचे संचालक प्रकाश पोहरे व येथील व्यवस्थापक मेहर कुमार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३0४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पीएसआय पठाण करीत आहेत.