एमआयडीसीतून तुर चाेरणारे दाेघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:58 PM2021-07-05T16:58:36+5:302021-07-05T16:58:46+5:30
Arrested for stealing pulses from Akola MIDC : दाल मीलमधून अज्ञात चाेरटयाने ३० जुन राेजी ६५ हजार रुपये कीमतीचे ३२ पाेते तूर डाळ चाेरी केले हाेते़.
अकाेला : एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दाल मीलमधून तुर चाेरणाऱ्या एका चाेरटयास एमआयडीसी पाेलिसांनी अटक केली़. या चाेरटयाकडून चाेरलेली तूरीचे पाेते व चेारीसाठी वापरलेला ऑटाे असा एकून दाेन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़. एमआयडीसीमध्ये माेहीत गजानन भाला यांचे ओम अॅग्राे इंडस्ट्रीज नावाने दाल मील असून, या दाल मीलमधून अज्ञात चाेरटयाने ३० जुन राेजी ६५ हजार रुपये कीमतीचे ३२ पाेते तूर डाळ चाेरी केले हाेते़. या प्रकरणी माेहीत भाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पाेलिसांनी अज्ञात चाेरटयाविरुध्द गुन्हा दाखल करून या चाेरीचा तपास सुरु केला़. त्यानंतर मीळालेल्या माहीतीवरून पाेलिसांनी प्रीतम दलीत खील्लारे, रा़. गाैतम नगर, शिवणी यास ताब्यात घेतले़. त्यानंतर त्याची कसून चाैकशी केली असता आराेपीने चाेरी केल्याची कबुली दिली़. यावरून पाेलिसांनी त्याच्याकडून चाेरीसाठी वापरलेला ऑटाे व तुरीचे पाेते असा एकून दाेन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आहे़ ही कारवाइ पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अतीरीक्त पाेलीस अधीक्षक माेनीका राउत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार कीशाेर वानखेडे, दयाराम राठाेड, निलेश भाेजने, संताेष डाबेराव यांनी केली़.