बोरगाव मंजू येथे अहिंसा यात्रेचे आगमन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:00+5:302021-04-14T04:17:00+5:30
सद्भावनेने वागण्याचा प्रयत्न करणे, व्यसनमुक्त जीवन आदी संकल्प करीत या अहिंसा यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. अहिंसा यात्रा तीन ...
सद्भावनेने वागण्याचा प्रयत्न करणे, व्यसनमुक्त जीवन आदी संकल्प करीत या अहिंसा यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. अहिंसा यात्रा तीन देश व भारतातील २० राज्यातून भ्रमण करणार आहे. या यात्रेचे सद्भावनेचा प्रसार, नैतिकतेचा प्रसार व व्यसनमुक्ती अभियान आदी उद्दिष्ट असून, लक्षावधी लोक अहिंसा यात्रेच्या तीन प्रज्ञान प्रतिज्ञांचा स्वीकार करीत आहेत. आचार्य श्री महाश्रमण यांना विविध राज्यात अतिथी घोषित करण्यात आले आहे. तसेच नेपाळ सरकारतर्फे अहिंसा यात्रेवर पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले आहे. अहिंसा यात्रा जातीपातीच्या भेदभावापासून दूर असून, कोणत्याही जाती-धर्म क्षेत्र किंवा संप्रदायाशी संबंधित व्यक्ती आचार्य श्री महाश्रमण यांचे दर्शन प्रवचन श्रावणाचा लाभ घेऊ शकतात. आचार्य श्री महाश्रमण यांचे प्रवचन दररोज सकाळी ८.१० ते ८.३५ पर्यंत एका खासगी वाहिनीवर प्रकाशित होणार आहे. आचार्य श्री महाश्रमण यांनी स्वत: ४७ हजार किलोमीटर पदयात्रा पूर्ण केली असून, त्यांच्या प्रेरणेने जवळपास एक कोटींहून अधिक नागरिकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे. आचार्य श्री महाश्रमण यांच्या नेतृत्वात ८०० हून अधिक साधू व साध्वी, ४० हजारांहून अधिक युवक, कार्यकर्ते व लक्षावधी अनुयायांनी समाज उद्धाराच्या या कार्याला वाहून घेतले आहे. (फोटो)