कापशी तलावात कुरव पक्ष्यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:12 PM2021-04-06T12:12:22+5:302021-04-06T12:12:28+5:30
Arrival of Brown headed Gull in Kapashi Lake कापशी तलावात यावर्षी पहिल्यांदाच तपकिरी डोक्याच्या कुरव पक्ष्यांनी हजेरी लावली आहे.
अकोला : जैवविविधतेने नटलेल्या कापशी तलावात यावर्षी पहिल्यांदाच तपकिरी डोक्याच्या कुरव पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. ही अकोलेकरांसाठी एक आनंदाची बाब होय.
हिवाळ्यात अनेक विदेशी पक्षी आपल्याकडील विविध पाणवठ्यांवर हजेरी लवत असतात. तसेच परतीच्या प्रवासात ते पोटपूजेसाठी विविध ठिकाणी मुक्कामी थांबतात. असाच डेरा कुरव द्विजगणांनी कापशी तलावावर ठोकला आहे. सध्या या द्विजगणांचा विणीचा हंगाम असल्यामुळे त्यांचे मूळ सौंदर्य आणखीनच खुलले आहे. या पक्ष्यांना इंग्रजीमध्ये Brown headed Gull म्हणतात. या समुद्री पक्ष्यांची ही अकोल्यातील पहिलीच नोंद असल्याचे येथील ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी सांगितले. स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या या पक्ष्यांना हंसराज मराठे यांनी पक्षी निरीक्षणादरम्यान कॅमऱ्यात कैद केले आहे.