कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 03:34 PM2019-08-26T15:34:41+5:302019-08-26T15:37:41+5:30

पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले.

Arrival of Kavadhari Shiva devotees in Akola; Worship of lord Rajarajeshwara | कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक

कावडधारी शिवभक्तांचे अकोल्यात आगमण; राजराजेश्वराला जलाभिषेक

googlenewsNext


अकोला : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला अकोल्याच्या कावड महोत्सवाला सुरुवात झाली असून, रविवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या कावडधारी शिवभक्तांचे सोमवारी सकाळी अकोल्यात आगमण झाले. पहिली कावड राजराजेश्वर मंदीराकडे रवाना झाली आहे. हजारो शिवभक्त दिवसभर कावडमधून आणलेल्या जलाचा अभिषेक राजराजेश्वराला करणार आहेत.
शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
या अमृत महोत्सवात सहभागी होण्यासाठी शिवभक्तांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात कावड व पालखींचे स्वागत करण्यात येत आहे.


जुने शहरातून सर्वाधिक कावड
जुने शहरात कावड मंडळांची मोठी संख्या आहे. यंदा सर्वाधिक भरणे असलेली डाबकी रोडवासी मित्र मंडळ, हरिहरपेठमधून निघणारी श्री राम सेना मंडळाची कावड, मानाचे स्थान असणारी हरिहर शिवभक्त मंडळ, जय भवानी शिवभक्त मंडळ तसेच सर्वाधिक साडेचार हजार सदस्य संख्या असणाºया जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १०१ भरण्यांची कावड तसेच विठ्ठलाच्या दशर्नाचा देखावा अकोलेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.


पावसातही शिवभक्तांमध्ये उत्साह
खांद्यावरून सर्वाधिक संख्येने भरणे आणण्यामध्ये जुने शहरातील काही प्रमुख कावड मंडळांचा समावेश आहे. सोमवारी वरुणराजाने हजेरी लावली. भरपावसातही शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.

Web Title: Arrival of Kavadhari Shiva devotees in Akola; Worship of lord Rajarajeshwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.