शिक्षणासोबतच कलेचा व्यासंग आवश्यक; पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:23 PM2018-01-20T14:23:20+5:302018-01-20T14:25:27+5:30
अकोला: आज विध्यार्थ्यांना इच्छा,अनुशासन व योग्य दिशेची गरज असून, या त्रीसूत्रीय गुणांच्या अंगिकारणाने विध्यार्थी हा उद्याच्या प्रगत भारताचा निर्माता बनू शकतो.त्यासाठी शिक्षण संस्थांनी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.
अकोला: आज विध्यार्थ्यांना इच्छा,अनुशासन व योग्य दिशेची गरज असून, या त्रीसूत्रीय गुणांच्या अंगिकारणाने विध्यार्थी हा उद्याच्या प्रगत भारताचा निर्माता बनू शकतो.त्यासाठी शिक्षण संस्थांनी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.
स्थानीय मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात शनिवारी एक दिवसीय नवीन भारताच्या निर्मितीवर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अकोला गुजराती समाजाचे पदाधिकारी रवीभाई पटेल यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रकुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर,संस्थेचे पदाधिकारी सुरेशभाई शाह,दीपेंन शाह,कनूभाई सायानी,संस्थेचे मुख्याधिकारी एच.सी.भंडारी,प्राचार्य एस.पी.रोठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली. ते पुढे म्हणाले ,चीन,कोरिया सारखी राष्ट्रे ही विध्याथार्नी आपणास राष्ट्राच्या प्रगतीसाठी झोकून दिल्यामुळे झाली.ही भूषणावह बाब असून अशीच अपेक्षा देशाला विद्यार्थ्यांपासून आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सैनिक,गरजू नागरिकांना रक्त मिळावे यासाठी तरुणांनी रक्तदानाला महत्व देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने पालकमंत्री डॉ.पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राजेश जयपूरकर यांनीही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील टॉपर सोनम पंजवानी,नयना मोटवानी व पीएचडी प्राप्त करणाºया प्रा.रत्ना चांडक यांचा रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक एच.सी. भंडारी यांनी,पाहुणे परिचय कु. गाडोदिया यांनी,संचालन प्राचार्य स्मिता शिंगरूप यांनी तर आभार अनिमा शर्मा यांनी मानलो. यावेळी अनेक महाविद्यालयातील विध्यार्थी, प्राध्यापक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.