प्रवाहाविरोधातील कलाकृतींना रसीकाश्रय मिळाला पाहिजे
By Admin | Published: August 21, 2015 12:12 AM2015-08-21T00:12:26+5:302015-08-21T00:12:26+5:30
लोकमत मुलाखत; नाट्य कलावंत राजकुमार तांगडे यांचे प्रतिपादन.
बीड : पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे जागोजागी उगवलेल्या पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या इंग्रजी, सेमी इंग्रजी संस्थांमध्ये महागडे शुल्क आकारुन प्रवेश दिले जातात. मात्र, शुल्काच्या तुलनेत सुविधा तोकड्या आहेत. त्यामुळे काही संस्थांमध्ये बालकांच्या शिक्षणाचा अक्षरश: पोरखेळ सुरु आहे. ‘लोकमत’ने गुरुवारी काही संस्थांमध्ये केलेल्या स्टींगमधून ही बाब समोर आली.
सहा वर्षांपुढील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार शासनाने कायदेशीरपणे दिला आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी शासनाने ठिकठिकाणी अंगणवाड्या सुरु केलेल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत इंग्रजी शिक्षणाचे आकर्षण वाढले आहे. स्पर्धेच्या युगात नर्सरी, एलकेजी, यूकेजीमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा ओढा आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचे पेव फुटले. तीन वर्षे वयाच्या बालकांना नर्सरी, ४ वर्षांच्या बालकांसाठी एलकेजी तर पाच वर्षांच्या बालकांना यूकेजीत प्रवेश दिले जातात.
हसत - खेळत आनंदी शिक्षण देण्याचा गवगावा करणाऱ्या बहुतांश संस्था पालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल करतात; परंतु काही संस्थांकडे आवश्यक त्या सुविधाही नाहीत. ग्रामीण भागातील संस्थांमध्ये सुविधा नसण्याचे प्रमाण अधिक आहे. हसत- खेळत शिक्षणाची जाहिरात केली जाते; पण बालकांना खेळण्यांचे साहित्य देखील पुरविले जात नाहीत. पूर्वप्राथमिक शिक्षण संस्थांची वेळ तीन तासांची असते. या वेळेत किमान एक तास वेळ हा खेळण्यासाठी देणे आवश्यक आहे; परंतु खेळण्याच नसल्याने बालके कसेबसे तीन तासाचा वेळ घालवतात. रोज सोबत आणलेला डबा खाणे व शिक्षकांच्या नियंत्रणाखाली मन मारुन व बालहट्ट सोडून वह्या, पुस्तकात डोके घालून बसणे हा नित्याचा प्रयोग सुरु असल्याचेही यावेळी दिसून आले. (प्रतिनिधी)