अरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:37+5:302020-12-26T04:15:37+5:30
अकोला : डॅडी देशमुख स्मृती लघुचित्रपट आयोजन समितीच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा लघुचित्रपट महोत्सव यावर्षी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात ...
अकोला : डॅडी देशमुख स्मृती लघुचित्रपट आयोजन समितीच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा लघुचित्रपट महोत्सव यावर्षी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आला असून, त्या ऐवजी स्व. डॅडी देशमुख जयंती सोहळा होत असून, त्यात ख्यातनाम ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण घाटोळे यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती माजी आ. तुकाराम बिरकड, प्रा. डॉ. संतोष हुशे, प्रा. सदाशिव शेळके, पंकज देशमुख, प्रा.मधू जाधव, डॉ. राजेंद्र देशमुख यांनी दिली.
स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृतीत या वर्षी नाट्य क्षेत्रातील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाट्यकर्मी अरुण घाटोळे हे अनेक वर्षांपासून महानगरातील सांस्कृतिक व नाट्यक्षेत्रात कार्यरत आहे. उतरते वय झाल्यावरही त्यांचे नाट्य कार्य अद्यापही सुरू आहे. स्व. डॅडी देशमुख यांच्या नाट्य व चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा घाटोळे यांच्या रूपाने उजाळा मिळावा यासाठी हे आयोजन होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रस्तुत जयंती सोहळा रविवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सायं ६ वाजता स्थानीय सेंट्रल प्लाझा येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते व महापौर अर्चना मसने यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात सामाजिक अंतर राखत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी डॉ. राजेश देशमुख, कुणाल देशमुख, प्रा. अनुराग मिश्रा, प्रा. अशोक भराड, डॉ. प्रभाकर मोहे, श्रीराम पालकर आदी यावेळी उपस्थित होते.