Arun Jaitley Death: भाजपासोबतच राष्ट्राची मोठी हानी - संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 04:42 PM2019-08-24T16:42:47+5:302019-08-24T16:42:52+5:30
माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने भाजप तसेच देशाची मोठी हानी झाल्याच्या संवेदना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केल्या.
अकोला : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने भाजप तसेच देशाची मोठी हानी झाल्याच्या संवेदना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केल्या. विद्यार्थी दशेपासूनच लढाऊ बाणा अंगी असलेल्या माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आयुष्यभर भाजपाचे ध्येय धोरण व विचारसरणी समोर ठेऊन देशहितासाठी कार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून नेतृत्व गुण विकसित, अधिक परिपक्व, व्यापक बहु आयामी अभ्यासू, विधीतज्ञ, आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांचे आंदोलनात अग्रणी नेतृत्व होते. जेष्ठ मार्गदर्शक व चांगले सहकारी अरुण जेटली यांच्या निधनाने या पंधरवड्या दुसरा धक्का बसला असून, पक्षासोबत राष्ट्राची मोठी हानी झाल्याचे संजय धोत्रे म्हणाले. आज संजय धोत्रे यांनी त्यांचे संपूर्ण कार्यक्रम रद्द करून जेटलींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
भाजपाने चाणक्य गमावला - गोवर्धन शर्मा
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व विख्यात कायदेतज्ज्ञ आणि भाजपाला संसदेपासून रस्त्या पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली यांच्या निधनाने पक्षाची फार मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली.
लोकशाहीचे पाईक अरुण जेटली - रणधीर सावरकर
विद्यार्थ्यांचे संघटन उभारून आणि बाणीच्या काळात बातमीपत्र तयार करून लोकशाही मजबूत केली तसेच मिसा विरुद्ध जन आंदोलन करून विविध विषयांवर अभ्यास करून आर्थिक क्षेत्र तसेच मंत्रिमंडळात विविध पदे भूषवून त्या पदांना न्याय देणारे लोकशाहीचे पाईक अरुण जेटली यांच्या निधनाने प्रखर नेतृत्व, प्रखर वक्ता हरपल्याची प्रतिक्रिया आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली.