आशा स्वयंसेविकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:15 AM2021-06-02T04:15:53+5:302021-06-02T04:15:53+5:30
यावेळी आ. गोवर्धन शर्मा, आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, शहर ...
यावेळी आ. गोवर्धन शर्मा, आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, शहर सरचिटणीस संजय गोडा, डॉ. विनोद बोर्डे संजय जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर, जयंतराव मसने, महिला आघाडी प्रभारी अश्विनी हातवळणे, महिला आघाडी शहराध्यक्षा चंदा शर्मा आदी उपस्थित हाेते.
आ. सावरकर यांनी आशा सेविका या समाजासाठी ‘आशा’ आहेत व त्यांच्या भक्कम खांद्यावर आज जनतेचे आरोग्य जतन करण्याची मोलाची जबाबदारी आहे व त्या ही जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत, असे गाैरवाेद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका पल्लवी मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन अभिजित कडू यांनी केले
फाेटाे...
..................................................
शिवभोजन थाळी मागणीनुसार द्या
अकोला : शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळी जनतेच्या मागणीनुसार देण्याची मागणी मूव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टिस, एमपीजेने केली आहे.
शिवभोजन थाळी योजनेचा
विस्तार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजनेचा लाभ देण्याचे आवाहन मूव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टिसचे रमेश कदम, मो. आतिक यांनी केले आहे.
..................................................
लाभार्थींना ट्रॅक्टर वितरण
अकोला : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. अकोलातर्फे वैयक्तिक व्याज परतावा योजनेंतर्गत लाभार्थी संजय देशमुख व गजेंद्र मते या दोन जणांना व्यावसायिक ट्रॅक्टरचे वितरण आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ, अकोला रोहित बारस्कर उपस्थित होते.
..................................................
विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा
अकाेला :
अकोल्यातील प्रज्ञावंत विद्यार्थी हे शैक्षणिक कार्यासाठी विदेशात जातात. त्यांचे व त्यांच्या परिवाराचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी रश्मी शैलेश देव यांनी केली आहे. आपल्यामार्फत गेल्या काळात बँक, पोस्ट, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले, त्याच धर्तीवर लसीकरण करण्याची मागणी केली आहे.
..................................