आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांनी केली निदर्शने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:51+5:302021-06-19T04:13:51+5:30
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा ही मागणी पूर्ण होइपर्यंत आशा स्वयंसेविकांना १८ हजार रुपये व ...
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा ही मागणी पूर्ण होइपर्यंत आशा स्वयंसेविकांना १८ हजार रुपये व गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये प्रतिमहा वेतन देण्यात यावे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतील दुसऱ्या टप्प्याचा मोबदला निश्चित करुन देण्यात यावा, कोरोनाबाधित आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपचाराकरिता बेड राखीव ठेवण्यात यावेत आणि विनामूल्य उपचार करण्यात यावेत, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा आदेश शासनाने काढला असून, त्यामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा आदी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जूनपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आला. त्यामध्ये आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना अकोला व वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने १८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजन गावंडे, सचिव संध्या डिवरे, संतोष चिपडे, रुपाली धांडे, उमा इसेकर यांच्यासह जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाले होते.
......................फोटो......................................