आशिया कप; अकोल्याचा अथर्व तायडे भारतीय इमर्जिंग संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 03:33 PM2018-11-05T15:33:34+5:302018-11-05T15:37:24+5:30
अकोला : श्रीलंका येथे २ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार असलेल्या आशिया क्रिकेट कप स्पर्धेसाठी भारतीय इमर्जिंग संघाची निवड करण्यात आली असून, यामध्ये अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा डावखुरा सलामी फलंदाज अथर्व तायडेने स्थान पटकावले आहे.
अकोला : श्रीलंका येथे २ ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार असलेल्या आशिया क्रिकेट कप स्पर्धेसाठी भारतीय इमर्जिंग संघाची निवड करण्यात आली असून, यामध्ये अकोला क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेचा डावखुरा सलामी फलंदाज अथर्व तायडेने स्थान पटकावले आहे. कोलकाता येथे ज्यूनियर भारतीय निवड समितीने संघाची घोषणा केली.
शैलीदार डावखूरा फलंदाज असलेल्या अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघाने यावर्षी १९ वर्षाखालील स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला होता. अथर्व तायडेने मलेशिया येथे झालेल्या १९ वर्षाखालील आशिया कप व श्रीलंका येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील कसोटी मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. अथर्वची भारतीय संघात झालेली निवड अकोला क्रिकेट क्लबसाठी अभिमानाची बाब असल्याचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक तथा अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी सांगितले.