मालमत्तेच्या वादातून भावावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:03 IST2020-05-15T10:03:44+5:302020-05-15T10:03:57+5:30
एरंडा येथील नरेंद्र मुरलीधर शर्मा व त्यांचा भाऊ ओमप्रकाश शर्मा यांच्यामध्ये कौटुंबिक संपत्तीवरून वाद सुरू आहे.

मालमत्तेच्या वादातून भावावर प्राणघातक हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शीटाकळी : कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावासह तिघांनी एका इसमावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना १४ मे रोजी एरंडा येथे घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
एरंडा येथील नरेंद्र मुरलीधर शर्मा व त्यांचा भाऊ ओमप्रकाश शर्मा यांच्यामध्ये कौटुंबिक संपत्तीवरून वाद सुरू आहे. १४ मे रोजी नरेंद्र शर्मा हे खोली बनविण्याच्या उद्देशाने कामगारांसमवेत भूखंडांची मोजणी करीत होते. दरम्यान, यावेळी तेथे ओमप्रकाश शर्मा, पवन ऊर्फ संदीप शर्मा आणि अरुण शर्मा आले. त्यांनी वाद घातला. मजुरांनी मध्यस्थी करून तिघांना परत घरी पाठविले; परंतु त्यांनी घरी जाऊन तलवार आणून नरेंद्र शर्मा यांच्यावर तलवारीने प्राणघात हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमीस रुग्णालयात दाखल केले. नरेंद्र शर्मा यांच्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३०७, ५०४, ३४ आणि कलम ४, २५ (आर्म अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास जमादार संजय ठाकरे आणि संतोष वाघमारे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)