मालमत्तांची माहिती संकलितच होईना!
By admin | Published: February 9, 2016 02:21 AM2016-02-09T02:21:44+5:302016-02-09T02:21:44+5:30
मोजणी शिटवरील माहितीमुळे ऑपरेटरचा गोंधळ; मनपासमोर कर वाढीचे संकट.
अकोला: पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्तांची माहिती संगणकीकृत करताना ह्यडाटा एन्ट्री ऑपरेटरह्णपुढे अनेक अडचणी येत असून, मोजणी शिटवर अचूक माहितीचा अभाव असल्यामुळे अचून माहिती नोंदविताना संगणक परिचालकांचा गोंधळ उडत आहे. या पृष्ठभूमीवर ही माहिती संगणकीकृत करताना दीर्घ कालावधी लागण्याची शक्यता आहे. तत्कालीन अधिकार्यांच्या हेकेखोरपणाचा फटका महापालिका प्रशासनाला बसत असून, कर वाढ करण्याशिवाय दूसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही. महापालिकेच्या उत्पन्नात १२0 कोटींनी वाढ होईल, असा गवगवा करीत मालमत्तांचे नव्याने पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय तत्कालीन अधिकार्यांनी घेतला होता. संबंधित अधिकार्यांनी मालमत्ता कर विभागाच्या मदतीने एप्रिल २0१५ मध्ये पुनर्मूल्यांकन मोहिमेला सुरुवात केली. कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय भर उन्हाळ्य़ात ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मालमत्ता विभागाचे वसुली निरीक्षक, नगर रचना-बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता यांच्यासह महापालिका शिक्षकांनादेखील जुंपण्यात आले होते. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच या मोहिमेसाठी ५00 कर्मचार्यांचा फौजफाटा वापरण्यात आला. पहिल्या टप्प्यात दक्षिण झोन व त्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार झोननिहाय मोजणी करण्यात आली. दक्षिण झोनमधील मोजणी पूर्ण झाल्यानंतर कर्मचार्यांनी प्लॉटचे एकूण क्षेत्रफळ गृहीत धरणे अपेक्षित होते. तसे न करता केवळ मालमत्तांची मोजणी करण्यात आली. अर्थातच ही चूक कागदोपत्री कायम असल्याची माहिती आहे. अप्रशिक्षित शिक्षक, सुरक्षा रक्षकांकडून ही मोजणी झाली असून, मोजणी शिटवरील माहिती अचूक नाही. मालमत्तांच्या नोंदी करण्यास दिरंगाई झाली असून, मनपाने नियुक्त केलेल्या २0 डाटा एन्ट्री ऑपरेटरला ९0 हजार मालमत्तांची माहिती संकलित करताना प्रशासनाच्या चुकीमुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे