२४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:50 AM2020-02-28T10:50:02+5:302020-02-28T10:53:14+5:30
आणखी २४ कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात प्राप्त झालेली ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपये मदतीची रक्कम गुरुवार, २७ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, जिल्ह्यातील १७ हजार शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी आणखी २४ कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी दोन टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी तहसील कार्यालयांमार्फत शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्यात आले. त्यानुसार २७ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात पीक नुकसान भरपाईच्या मदतीची रक्कम जमा करण्यात आली. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १७ हजार शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी आणखी २४ कोटी रुपयांच्या मदतनिधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने चौथ्या टप्प्यात २४ कोटी रुपयांचा मदतनिधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यात शासनाकडून प्राप्त झालेली ३६ कोटी ७९ लाख रुपये मदतीची रक्कम जिल्ह्यातील २४ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उर्वरित १७ हजार शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी चौथ्या टप्प्यात २४ कोटी रुपयांचा मदतनिधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.