जिल्ह्यात १२ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:16 AM2021-05-30T04:16:51+5:302021-05-30T04:16:51+5:30

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत इमारत बांधकाम कामगारांसाठी प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ...

Assistance deposited in the accounts of 12,000 construction workers in the district! | जिल्ह्यात १२ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा !

जिल्ह्यात १२ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा !

Next

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत इमारत बांधकाम कामगारांसाठी प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार २५ मेपर्यंत जिल्ह्यात नोंदणीकृत ११ हजार ९१५ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना कोरोनाकाळात मदतीचा आधार मिळाला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, गत १४ एप्रिल रोजीपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. कडक निर्बंधांच्या कालावधीत कामगारांना रोजगार नसल्याने इमारत बांधकाम कामगारांसाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार इमारत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांची मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत जिल्ह्यात १५ हजार २६२ बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असून, त्यापैकी नोंदणीचे नूतनीकरण केलेल्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांची मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये २५ मेपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९१५ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांच्या मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांसाठी शासनामार्फत प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २५ मेपर्यंत जिल्ह्यातील ११ हजार ९१५ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसाहाय्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

- राजू गुल्हाने,

साहाय्यक कामगार आयुक्त, अकोला

Web Title: Assistance deposited in the accounts of 12,000 construction workers in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.