अकोला जिल्ह्यातील पाच शाळांना ‘अटल टिंकरिंग लॅब’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 01:19 PM2019-12-21T13:19:14+5:302019-12-21T13:19:28+5:30

जय बजरंग विद्यालय, मिल्लत उर्दू हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल तसेच मूर्तिजापूर येथील सेंट अ‍ॅन्स हायस्कूल या शाळांचा समावेश आहे.

'Atal Tinkering Lab' to five schools in Akola district! | अकोला जिल्ह्यातील पाच शाळांना ‘अटल टिंकरिंग लॅब’!

अकोला जिल्ह्यातील पाच शाळांना ‘अटल टिंकरिंग लॅब’!

Next

अकोला : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेंतर्गत अकोल्यातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे.
मुलांना विज्ञानाची गोडी लागून जिज्ञासा वाढावी व त्यांनी उपकरणे तयार करून संशोधनास प्रवृत्त व्हावे, या हेतूने अटल टिंकरिंग लॅब शाळांमध्ये उभारण्यात येत आहेत. वैज्ञानिक साधने व विविध उपकरणे यासाठी नीती आयोगाकडून निधी दिला जातो. यंदा जिल्ह्यातील पाच शाळांची अटल टिंकरिंग लॅबसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये जय बजरंग विद्यालय, मिल्लत उर्दू हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल तसेच मूर्तिजापूर येथील सेंट अ‍ॅन्स हायस्कूल या शाळांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना वैज्ञानिक तंत्रज्ञानाची गोडी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व ग्रामीण या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना २० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

Web Title: 'Atal Tinkering Lab' to five schools in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.