राज्यातील १८ वर्षांवरील खेळाडूंचे होणार लसीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:29+5:302021-07-01T04:14:29+5:30

ऑलिम्पिक दिन ते ऑलिम्पिक स्पर्धा कालावधीत राबविण्यात येणार उपक्रम रवी दामोदर अकोला : ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे क्रीडा विभागाचा कुंभमेळा ...

Athletes above 18 years of age will be vaccinated in the state! | राज्यातील १८ वर्षांवरील खेळाडूंचे होणार लसीकरण!

राज्यातील १८ वर्षांवरील खेळाडूंचे होणार लसीकरण!

Next

ऑलिम्पिक दिन ते ऑलिम्पिक स्पर्धा कालावधीत राबविण्यात येणार उपक्रम

रवी दामोदर

अकोला : ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे क्रीडा विभागाचा कुंभमेळा असतो. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. यंदा मात्र टोकियो ऑलिम्पिक २०२० आशिया खंडात आयोजित करण्यात येणार आहे. याचे आयोजन दि. २३ जुलै ते दि. ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय १८ वर्षांवरील खेळाडूंचे लसीकरण करण्यात येणार आहे.

देशात व राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. ऑलिम्पिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक दिन

ते ऑलिम्पिक स्पर्धा समाप्तीपर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १८ वर्षांवरील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मुले व मुली यांना प्राधान्याने कोविड-१९ चे लसीकरण करण्याबाबत कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटना यांनी आपापल्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी लसीकरण केले किंवा नाही, याबाबत माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि.२२ जुलै २०२१ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

--------------------------------

ऑलिम्पिक मेळाव्यास सहभागी होणाऱ्या खेळाडूंना देता येणार ऑनलाइन शुभेच्छा.

यंदा आशिया खंडात ऑलिम्पिक मेळावा होत आहे. ऑलिम्पिक दिन ते टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन यांचे औचित्य साधून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यामध्ये खेळाच्या वातावरण निर्मितीसाठी विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.

--------------------------------

Web Title: Athletes above 18 years of age will be vaccinated in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.