खेलो इंडिया एक्सलन्स सेंटरअंतर्गत ॲथलेटिक्स खेळाच्या प्रवेश चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:44+5:302021-09-19T04:19:44+5:30
त्या करिता ॲथलेटिक्स खेळामध्ये राज्य स्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ज्यांचे (वय ...
त्या करिता ॲथलेटिक्स खेळामध्ये राज्य स्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू ज्यांचे (वय २०) वर्षांआतील म्हणजे जानेवारी २००२ नंतरचा जन्म दिनांक असून, राज्य निपुणता केंद्राअंतर्गत प्रवेशासाठी ॲथलेटिक्स खेळामधील खालील स्पर्धा बाबीसाठी निश्चित केलेल्या माणकानुसार पात्र ठरत असलेल्या मुले व मुली खेळाडूंकरिता निवड चाचणीचे आयोजन दि. २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ॲथलेटिक्स खेळातील विविध बाबींच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.
चाचणीकरिता मैदानी खेळ उपप्रकारानुसार वेळ, अंतर बाबत मानके निश्चित केलेले आहेत, तसेच वजन, उंची, ३० मी. भरधाव धावने, जागेवरून लांब उडी, शटल रन आदी चाचणी आयोजन करण्यात येईल. मुलांकरिता उंची १७० से.मी. वर असावी, वजन ५२ कि.लो.वर असावे, मुलींकरिता उंची १६५ से.मी. वर असावी वजन ४५ कि.लो.वर असावे.
कोविड १९ चे परिस्थितीत चाचणी होत असल्या कारणाने खेळाडूस कोविड व्हॅक्सिन/आर.टी.पी.सी.आर.टेस्ट प्रमाणपत्र, नाव, जन्म दिनांक, शिक्षण, खेळाचा प्रकार, क्रीडा विषयक कामगिरी प्रमाणपत्र, स्पर्धेचे नाव, पत्र व्यवहाराचा पत्ता, आदी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे शिफारस पत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहील.
शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात आली असून, प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करावा लागेल. चाचणीस येताना खेळाडूंना लागणारे आवश्यक क्रीडा साहित्य त्यांनी स्वत: घेऊन जावे, तसेच राज्य राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रावीण्य प्रमाणपत्राची छायांकित व मूळ प्रत सोबत ठेवावी. तरी जिल्ह्यातील ॲथलेटिक्स खेळामध्ये राज्यस्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या पात्र खेळाडूंनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन आसाराम जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. खेळाडूंनी बाबनिहाय चाचणीच्या एक दिवस पूर्वी सांयकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांचे शिफारस पत्र व आवश्यक कागदपत्रासह शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे उपस्थित राहावयाचे आहे.