पुन्हा ‘एटीएम’ बंद!

By admin | Published: January 31, 2017 02:32 AM2017-01-31T02:32:19+5:302017-01-31T02:32:19+5:30

बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांचे ‘एटीएम’ सोमवारी दुपारपर्यंंत बंद राहिले.

'ATM' closed again! | पुन्हा ‘एटीएम’ बंद!

पुन्हा ‘एटीएम’ बंद!

Next

अकोला, दि. ३0- शहरातील बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांचे ह्यएटीएमह्ण सोमवारी दुपारपर्यंंत बंद राहिले. परिणामी, पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आल्या पावली माघारी फिरावे लागले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बरेच दिवस बंद राहिलेल्या एटीएम केंद्रांमुळे अनंत अडचणींचा अकोलेकरांनी सामना केला. चलनात दाखल झालेल्या नव्या नोटांचा पुरवठा पुरेसा नसल्यामुळे, त्यावेळी बँकांसुद्धा ह्यएटीएमह्णमध्ये पैसे भरण्यास असर्मथ ठरल्या. त्यानंतर परिस्थिती बदलली खरी; मात्र महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी आणि रविवारी बँका बंद राहत असल्यामुळे, शुक्रवारी दिवसभरात जमा केलेल्या रोखीनंतर एटीएम केंद्रे रविवारी सायंकाळपर्यंंत तळ गाठतात. परिणामी, त्यानंतर येणार्‍या प्रत्येक सोमवारी शहरातील एटीएम केंद्रांमध्ये ठणठणाट असतो. रोख जमा करणारी यंत्रणा सशक्त असली तरी, सलग येणार्‍या या सुट्यांमुळे यंत्रणेला एटीएम केंद्रांमध्ये रोख जमा करणे शक्य होत नाही. कनेक्टिव्हिटी सुरळीत असतानासुद्धा केवळ रोख नसल्यामुळे सोमवारी दुपारपर्यंंत शहरातील बहुतांश एटीएम केंद्रे बंद राहिली. परिणामी, पैसे काढण्यासाठी गेलेल्या अकोलेकरांना रपेट करावी लागली. याबाबत बँक अधिकार्‍यांना विचारणा केली असता, सलग येणार्‍या सुट्यांमुळे महिन्याभरात किमान दोन वेळा अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'ATM' closed again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.