विवाहितेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: May 1, 2017 02:44 AM2017-05-01T02:44:52+5:302017-05-01T02:44:52+5:30

अकोला : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Atrocities on marriages; Trial against three accused | विवाहितेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहितेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

अकोला : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पिंप्री खुर्द येथील पीडित महिला २००० मध्ये आठव्या वर्गात शिकत होती. तिला सावत्र आई-वडील होते. तेव्हा गावातीलच तिच्या नात्यातील संजय प्रल्हाद खंडारे याला नोकरीवर लावण्यासाठी त्याच्या आईने सदर मुलीच्या आजोबाकडून २० हजार रुपये उसने मागितले होते. त्या बदल्यात संजयची आई सरस्वती हिने संजय याचे लग्न पीडीत मुलीसोबत लावण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर लग्न लावणार असे आमिष सतत दाखवून संजय खंडारेने सदर मुलीचे शारीरिक शोषण केले. नंतर सदर मुलीचे लग्न दुसऱ्या युवकासोबत झाले. ती विवाहित महिला हिवाळ्यात व उन्हाळ्यात माहेरी पिंप्री खुर्द येथे आली म्हणजे संजय खंडारे तिला धमकावून तिचे शारीरिक शोषण करावयाचा. त्या धास्तीने सदर महिला पिंप्री येथील तिच्या माहेरी येतच नव्हती. अशाच प्रकारे २९ एप्रिलपूर्वी सदर महिलेने तिच्या मुलींना सतत नकार दिल्यानंतर पतीने माहेरी न जाण्याचे कारण विचारले असता तिने उपरोक्त घटनाक्रम सांगितला. अखेर सदर महिलेने २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय प्रल्हाद खंडारे, सरस्वती प्रल्हाद खंडारे व प्रमोद प्रल्हाद खंडारे अशा तिघांविरुद्ध भादंवि ३७६, ४५२, ४१७, ५०६, ३४ सहकलम ३, ४, १६, १७ बालकांचे लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय खंडारे याला तत्काळ अटक केली. पुढील तपास एसडीपीओ राजेंद्र मनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार शरद भस्मे, गोपाल दातीर, गीतेश कांबळे करीत आहेत.

Web Title: Atrocities on marriages; Trial against three accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.