तलाठ्यावर हल्ला, आरोपीस अटक करा, अन्यथा काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:24 AM2021-02-17T04:24:25+5:302021-02-17T04:24:25+5:30

१० फेब्रुवारील अवैध गौण खनिज प्रतिबंधित कारवाई करण्यासाठी गेलेले तलाठी किशोर गायकी, सतीश दांडगे यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. ...

Attack on the lake, arrest the accused, otherwise the work stop agitation | तलाठ्यावर हल्ला, आरोपीस अटक करा, अन्यथा काम बंद आंदोलन

तलाठ्यावर हल्ला, आरोपीस अटक करा, अन्यथा काम बंद आंदोलन

Next

१० फेब्रुवारील अवैध गौण खनिज प्रतिबंधित कारवाई करण्यासाठी गेलेले तलाठी किशोर गायकी, सतीश दांडगे यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून मोक्का लावावा. अन्यथा काळ्या फिती लावून सुरू असलेले ‘काम बंद’ करण्यात येईल. असे निवेदन अकोट उपविभागातील तलाठी संघटनेने एसडीओ अकोट यांना मंगळवारी दिले.

शासनाने रेतीघाटांचा लिलाव केला नसल्याने रेती माफिया खुलेआम रेतीची अवैध वाहतूक करत आहेत. तालुक्यात महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करत असताना त्यांच्यावर रेती माफियांकडून हल्ले करण्यात येत आहेत. तलाठी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद देऊनही पोलीस विभागाकडून आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. १७ फेब्रुवारीपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास काम बंदचा इशारा संघटनेचे पदाधिकारी गणेश डोंगरे, संजय आपोतीकर, प्रवीण गिल्ले, अंकुश मानकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Attack on the lake, arrest the accused, otherwise the work stop agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.