अंकुरित पिकांवर ‘वाणी’चा हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:32 AM2020-06-20T10:32:31+5:302020-06-20T10:32:44+5:30

अंकुरित पिकांवर वाणी किडीने हल्ला केल्याने कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Attack of miliped on sprouted crops! | अंकुरित पिकांवर ‘वाणी’चा हल्ला!

अंकुरित पिकांवर ‘वाणी’चा हल्ला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसात पेरण्या आटोपल्या असून, पिकांना अंकुरही फुटले; मात्र अंकुरित पिकांवर वाणी किडीने हल्ला केल्याने कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यापासून बचावासाठी शेतकरी थिमेटचा वापर करत असले, तरी त्या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
गत तीन वर्षांपासून विविध संकटांशी सामना करणारा शेतकरी यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच वाणी किडीच्या पिकांवरील हल्ल्यामुळे त्रस्त झाला आहे. लॉकडाऊनमुळे पैसे उसनेपासने घेऊन, उधारीत व्यवहार करून शेतकºयांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली.
पहिल्या पावसात अनेक ठिकाणी कपाशी व तुरीची पिके अंकुरात व रोपात आली आहे. एकीकडे हरणांच्या कचाट्यात पिके सापडत असतानाच वाणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानेही पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वाणी वेचून काढणे, पिकाच्या मुळाशी थिमेट टाकणे आदी प्रयोग शेतकºयांकडून केले जात आहे; मात्र वाणीचा नायनाट करण्यासाठी ठोस सल्ला व उपाययोजनांबाबत बहुतांश शेतकºयांना माहिती नसल्याने पिकांचे नुकसान वाढत आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात एक ते दोन जोरदार पाऊस झाल्यानंतर पिकांच्या वाढीसह वाणीचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
उंदरांकडूनही बीजांची पोखरण
बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात नुकतीच पेरणी झालेले बीज उंदरांकडून फस्त केले जात असल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या या दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल आले आहेत.


पिकांवरील वाणी किडीच्या हल्ल्यासंदर्भात अ‍ॅडव्हायझरी देण्यात आली आहे. शिवाय कृषी विद्यापीठाद्वारे नियमित मार्गदर्शनही दिले जाते.
- डॉ. धनराज उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

 

Web Title: Attack of miliped on sprouted crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.