जम्मू-काश्मिरमध्ये हल्ले वाढले;शिवसेनेचा निषेध
By आशीष गावंडे | Published: July 18, 2024 09:09 PM2024-07-18T21:09:09+5:302024-07-18T21:09:47+5:30
मदनलाल धिंग्रा चौकात केली निदर्शने
अकाेला: मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वाढ झाली असून यामध्ये भारतीय जवानांना विरमरण प्राप्त हाेत आहे. साेमवारी सायंकाळी डाेडा शहरापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. दहशतवाद्यांकडून हाेत असलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी व शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मदनलाल धिंग्रा चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० हटविल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली हाेती. परंतु मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या घुसखाेरीचे प्रमाण वाढले असून त्यांच्याकडून भारतीय लष्करातील जवानांना लक्ष्य केले जात असल्याचे समाेर आले आहे. यामध्ये लष्करातील अनेक जवानांना विरमरण प्राप्त हाेत आहे. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महिला संपर्क प्रमुखांच्या नेतुत्वात धिंग्रा चौकात निर्दशने करण्यात आली. यावेळी महिला जिल्हा संघटीका देवश्री ठाकरे, उपजिल्हा संघटीका सुनिता तिजारे, सुनिता श्रीवास, शहर संघटिका वर्षा पिसोडे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहरप्रमुख (अकाेला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकाेला पूर्व) राहूल कराळे, उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, गजानन बोराळे, तालुकाप्रमुख नितीन ताथोड, सुरेंद्र विसपुते, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, संजय भांबेरे, छोटू खांदेझोड, प्रमोद धर्माळे यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.