एटीएम फोडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल
By admin | Published: December 6, 2015 02:17 AM2015-12-06T02:17:05+5:302015-12-06T02:17:05+5:30
स्टेट बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम दोन चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.
पारस (जि. अकोला): येथील स्टेट बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम दोन चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका आरोपीला अटकही केली. पारस येथील विद्युतनगर कामगार वसाहतमध्ये एटीएम आहे. याच परिसरात पोस्ट ऑफिस असून, विविध साहित्य विक्रीची दुकानेही आहेत. शुक्रवारी रात्री दोन अज्ञात आरोपी एटीएममध्ये घुसले. त्यांनी एटीएमधील एक प्लेट काढली. मात्र पूर्ण एटीएम फोडण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांच्या हाती रक्कम लागली नाही. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार एफ.सी. मिर्झा यांनी पारस येथे धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी बॅँक व्यवस्थापक श्रीराम उन्हाळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सोनू ऊर्फ अरविंद श्रीकृष्ण हिवराळे (३५) व योगेश सावळे (२0) या दोघांविरुद्ध भादंविचे कलम ३८0 (चोरी), ४५७ (गृह अतिक्रमण किंवा घरफोडी), ५११ ( प्रयत्न करणे) अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास हेड कॉन्स्टेबल एम.बी.खंडारे करीत आहेत.यापैकी हिवराळला पोलिसांनी अटक केली.