विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By admin | Published: May 7, 2017 02:44 AM2017-05-07T02:44:57+5:302017-05-07T02:44:57+5:30
चौघांविरुद्ध गुन्हा; उरळ येथील घटना.
उरळ (जि. अकोला) : जमिनीच्या वादातून २८ वर्षीय विवाहितेला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना काझीखेड येथे २९ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी चार जणांविरुद्ध ५ मे रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रेखा सुनील नांदोकार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातीलच अरुण नांदोकार, श्यामराव नांदोकार, यमुना श्यामराव नांदोकार आणि सरला अरुण नांदोकार यांनी विकत घेतलेली जमीन परत करण्याच्या मागणीसाठी वाद घातला. तसेच मारहाण करून रॉकेल अंगावर टाकले व पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विवाहितेच्या फिर्यादीवरून चारही जणांविरु द्ध उरळ पोलिसांनी कलम ३0७,५0४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी अरुण नांदोकार व श्यामराव नांदोकार यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. आर.के. साठवले करीत आहेत.