शेतकरी संघटनेच्यावतीने प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांच्या लागवडीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:43+5:302021-06-11T04:13:43+5:30
गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास शेतकरी संघटनेच्या माहिती व प्रसारण केंद्राचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ललित बहाळे यांच्याहस्ते व माहिती ...
गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास शेतकरी संघटनेच्या माहिती व प्रसारण केंद्राचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ललित बहाळे यांच्याहस्ते व माहिती तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार यांच्या प्रमुख उपस्थितीत अडगाव खुर्द येथील कसाईवाडा शिवारात शेतकऱ्यांनी प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणांची लागवड करण्यात येणार होती. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रतिबंधित कपाशी बियाणांची लागवड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फोटो:
घटनास्थळी पोलिसांचा बंदाेबस्त
यावेळी घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड व हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धीरज चव्हाण यांनी पोलिसांसह आरसीपीचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
प्रशासन आक्रमक बनल्याने, शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.