एचटीबीटी बियाण्यांसाठी शेतकऱ्याला अडकविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:03 AM2020-06-08T10:03:03+5:302020-06-08T10:05:15+5:30

शेतकऱ्यांना खोट्या प्रकरणात फसविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

Attempt to entrap the farmer for HTBT seeds | एचटीबीटी बियाण्यांसाठी शेतकऱ्याला अडकविण्याचा प्रयत्न

एचटीबीटी बियाण्यांसाठी शेतकऱ्याला अडकविण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे जाफरखा आमदखा यांना डमी व्यक्तीद्वारे फोन करून एचटीबीटी बियाण्यांची मागणी केली.बियाणे वा माल न सापडल्याने जाफरखा यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार कृषी विभागाने केली नाही.


अडगाव बु : शासनमान्यता नसलेले प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे अडगाव बु. येथे विकले जात असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाने रचलेला सापळा अयशस्वी ठरला. दुसरीकडे शेतकऱ्यांना खोट्या प्रकरणात फसविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
कृषी विभागाच्या अधिकाºयांनी अडगाव बु. येथील जाफरखा आमदखा यांना डमी व्यक्तीद्वारे फोन करून एचटीबीटी बियाण्यांची मागणी केली. त्यानुसार अडगाव बु. बसस्टँडवर सदर व्यक्तीला बोलवण्यात आले. त्यानंतर कृषी अधिकाºयांनी पोलिसामार्फत सदर व्यक्तीला सोबत घेतले; परंतु कोणत्याही प्रकारचे बियाणे वा माल न सापडल्याने जाफरखा यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार कृषी विभागाने केली नाही. आम्ही रचलेल्या सापळ्यात मुद्देमाल न सापडल्याने तक्रार देत नसल्याचे कृषी अधिकाºयांनी ठाणेदार आशीष लव्हांगळे यांना सांगितले. यावेळी जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे, जिल्हा मोहीम अधिकारी जंवजाळ, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे, व पंचायत समिती कृषी अधिकारी भारतसिंग चव्हाण हे हजर होते. दुसरीकडे या प्रकरणात कृषी विभागाने शेतकºयाला फसवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा हा प्रयत्न फसला असल्याची बाब शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून व्यक्त करण्यात आली. गेल्या वर्षी अडगाव बु. शेतशिवारात सविनय कायदेभंग करीत शेतकरी संघटनेच्या वतीने तंत्रज्ञान स्वतंत्रता आंदोलन छेडण्यात आले होते. यात शेतकºयांनी खुलेआम प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची जाहीर पेरणी केली होती. त्यावेळी २५ जून २०१९ ला अकोट व हिवरखेड पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या १६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा हवाला देत शेतकरी संघटनेने कृषी विभाग कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असल्याचा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे. शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे, माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार, तालुका प्रमुख नीलेश नेमाडे, युवा आघाडीचे दिनेश देऊळकार, मंगेश रेळे, दिनेश गिºहे, मकसूद मुल्लाजी इत्यादी कार्यकर्त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांना कृषी सेवा केंद्रांमध्ये अवैध औषधी व खतांचा साठा आहे, त्यावर आपण कारवाई करावी, अशी मागणी केली; परंतु त्यावर कृषी अधिकाºयांनी उत्तर देण्याचे टाळले. या प्रकरणाची शेतकरी संघटनेने दखल घेतली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून लवकरचआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


अडगाव बु. येथे अनधिकृतरीत्या एचटीबीटी बियाणे विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीकडे एचटीबीटी बियाण्यांची मागणी केली असता सदर व्यक्तीने बियाणे घेण्यासाठी अडगाव बु. बसस्टँडवर बोलावले. त्यानुसार सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता सापळा अयशस्वी झाला, त्यामुळे कारवाई करता आली नाही. सदर व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवर झालेल्या संभाषणाचे पुरावे आहेत.
- भरतसिंग चव्हाण, कृषी अधिकारी, पं. स. तेल्हारा


अडगाव बु. मधून किती तरी शेतकरी एचटीबीटी बियाण्यांबाबत कॉल आल्याचे सांगतात; पण पुढे येण्यास घाबरतात. अशाप्रकारे विविध ठिकाणच्या शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार एचटीबीटी बियाणे उपलब्ध असल्याचा संशय आल्याने अडगाव बु. येथे सापळा रचण्यात आला होता. बियाणे पुरावा हाती न लागल्याने तक्रार नोंदवली नाही.
- मिलिंद वानखडे,
तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

 

 

Web Title: Attempt to entrap the farmer for HTBT seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.