युवकाच्या कानशिलावर पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:38 AM2017-07-20T00:38:54+5:302017-07-20T00:38:54+5:30

मुलींच्या भांडणाचा वाद: कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

Attempt to kill a man wearing a pistol on his forehead! | युवकाच्या कानशिलावर पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न!

युवकाच्या कानशिलावर पिस्तूल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: दोन दिवसांपूर्वी मनपा शाळा क्रमांक ४ मध्ये मुलींच्या भांडणाच्या वादातून आरोपी राजा नासिर खान याने मोहम्मद अली रोडवरील कापड दुकानात घुसून युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्या कानशिलावर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ जुलै रोजी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.
फतेह चौकात राहणारा आवेश खान इकबाल खान (१८) याच्या तक्रारीनुसार त्याच्या वडिलाचे मोहम्मद अली रोडवर कापड दुकान आहे.
दोन दिवसांपूर्वी त्याची लहान बहीण आऐशा फातिमा आणि आरोपी राजा नासिर खान याची मावस बहीण उम्मे अम्मारा यांच्यात मनपा शाळा क्रमांक ४ येथे भांडण झाले होते. त्याची तक्रार आवेश खानच्या आईने कोतवाली पोलिसात दिल्यामुळे संतप्त झालेला आरोपी राजा नासिर खान हा मंगळवारी रात्री कापड दुकानावर आला. यावेळी आवेश खान दुकानावर हजर होता. त्याचे वडील इकबाल खान हे कापड खरेदीसाठी बाहेरगावी गेले होते. यावेळी राजाने आवेश खान याला अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कमरेजवळील पिस्तूल काढून आवेशच्या कानशिलावर लावून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला; परंतु येथे उपस्थित तौसिफ खान, रईस खान, सोहेल खान आणि रफिक खान यांनी आरोपी राजा नासिर खान याची समजूत घातली आणि त्याला पाठवून दिले.
आवेशच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी आरोपी राजा खान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0७, आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला.

पोलीस कारवाईत आरोपी राजाचा अडथळा
आवेश खान याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी राजा नासिर खान याला अटक करण्यासाठी बैदपुऱ्यातील लाल बंगला येथे गेलेल्या कोतवाली पोलिसांच्या पथकाला राजाच्या नातेवाईक व कुटुंबीयांनी अडथळा निर्माण केला आणि पोलिसांना आरोपीच्या घरात जाण्यापासून रोखले. कुटुंबीयांनी आतून दरवाजा बंद करून राजाला पळवून जाण्यासाठी मदत केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलीस शिपाई मोहम्मद नदीम नूर मोहम्मद यांच्या तक्रारीनुसार रामदासपेठ पोलिसांनी आरोपी नासिर खान याच्यासह चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Attempt to kill a man wearing a pistol on his forehead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.