फेसबुक अकाउंट हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 09:47 PM2020-06-09T21:47:29+5:302020-06-09T21:48:54+5:30
फेसबुक अकाउंट हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला
Next
म ूर्तिजापूर : येथील एका शिक्षकाचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या नावावर मेसेंजरवर मेसेज करून दुसºया शिक्षक मित्राला ५ हजार रुपये बँक खात्यात टाकण्याची मागणी केली. सदर प्रकार हा फसवेगिरीचा वाटत असल्याने थेट आपल्या शिक्षक मित्राला फोन लावला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषद मराठी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक इर्शाद हुसेन खान यांना फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अशोक उमाळे केंद्र प्रमुख किनखेड यांचे मॅसेंजर हॅक करून ५ हजार रुपयांची मागणी केली. हॅकर्सने मुलीची तब्येत खराब असल्याचे सांगितले. तेव्हा उमाळे हे आपल्याला ५ हजार मागू शकत नसल्याने ईर्शाद खान यांना शंका आली. त्यांनी त्या हॅकर्सला व्यस्त ठेवून अशोक उमाळे यांच्याशी संपर्क साधला असता अशोक उमाळे यांनी आपण कुठलाही मेसेज केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे उमाळे यांचे फेसबुक अकाउंट कोणीतरी हॅक केले असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा ईर्शाद खान यांनी सदर हॅकर्सला अनेक प्रश्न विचारले असता त्याने निरुत्तर होऊन मेसेजेस करणे थांबविले. एवढेच नव्हे तर त्या हॅकर्सने अशोक उमाळे यांच्या संपर्कातील अनेक लोकांना मेसेजेस करून माझी मुलगी आजारी असून, तिला दवाखान्यात भरती केले आहे, मला पैशाची अत्यंत गरज असून, मी आपणाला बँक खाते क्रमांक देतो. त्यावर शक्य तेवढ्या लवकर ५ हजार रुपये टाका. ते मी संध्याकाळपर्यंत परत करतो, असे मेसेजेस करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला; परंतु ईर्शाद खान या शिक्षकाने तो हाणून पाडला. (शहर प्रतिनिधी)