ग्रामीण भागातील मतदारांचे शहरात नाव नोंदविण्याचे प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:06+5:302021-09-03T04:20:06+5:30
नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता काही राजकीय मातब्बर मंडळींनी या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागातील बहुतांश मतदारांची नावे तेल्हारा शहरातील ...
नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता काही राजकीय मातब्बर मंडळींनी या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागातील बहुतांश मतदारांची नावे तेल्हारा शहरातील काही भागांमध्ये नोंदविल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता मतदार यादी ही पारदर्शक व्हावी याकरिता खरोखर जे मतदार तेल्हारा शहरांमध्ये राहतात. त्यांचीच नावे मतदार यादीत असणे आवश्यक आहे. जर का ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरांमध्ये काही जणांनी हेतुपुरस्परपणे नोंदविली असल्यास अशांवर कारवाई करून किंवा त्यांची नावे वगळून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी त्या मतदार यादीमध्ये खरोखरच शहरातीलच नावे आहेत की ग्रामीण भागातील नावे समाविष्ट करण्यात आली. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून ज्यांचा तेल्हारा शहराशी काहीएक संबंध येत नाही. ज्यांची मालमत्ता शहरांमध्ये नाही ज्यांचे रेशनकार्ड, इलेक्ट्रिक बिल, नळ बिल, आधारकार्ड अशा कुठल्याही प्रकारची कागदपत्रे ज्यांच्याजवळ तेल्हारा शहरातील नाहीत किंवा दोन्ही ठिकाणी आहेत. अशांची नावे जर शहरांमध्ये नोंदविल्या गेले असेल तर ते कायद्याचे उल्लंघन होणार आहे.
दुसऱ्या मोहल्ल्यातील भागांमध्ये नोंदविण्याचेसुद्धा प्रकार
शहरांमध्ये एका दूरवरच्या मोहल्ल्यातील नावे दुसऱ्या मोहल्ल्यातील भागांमध्ये नोंदविण्याचेसुद्धा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी ग्रामीण भागातील नावे शहरांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रकार घडला काय, या सर्व बाबींची शहानिशा करूनच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी तेल्हारा विकास मंचच्या वतीने तहसीलदार तेल्हारा यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, युवक आघाडी अध्यक्ष सोनू सोनटक्के, स्वप्निल सुरे, गौरव धुळे, मोहन श्रीवास, संतोष राठी, शेख ताजुद्दीन, मंगेश मामानकर, सोनू गाडगे, विजय इंगळे, सुनील फाटकर, आकाश बावणे, लखन मामनकार, वैभव मानकर, नीलेश धारपवार, अक्षय ठाकूर उपस्थित होते.
मतदारांनी ग्रामीण भागात व शहरी भागात अशा दोन ठिकाणी नाव नोंदविले असल्यास व ते निदर्शनास आल्यास या सर्व गोष्टींची पडताळणी करून मतदारांची नियमानुसार एकाच ठिकाणी नोंद केल्या जाईल.
- डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार तेल्हारा