बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात इसमाचा विहिरीत पडून मृत्यू

By admin | Published: September 21, 2015 01:29 AM2015-09-21T01:29:46+5:302015-09-21T01:29:46+5:30

बकरीही दगावली; कठडे नसलेली विहीर बुजविण्याची मागणी.

In an attempt to save the goat, its wellness drowned in death | बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात इसमाचा विहिरीत पडून मृत्यू

बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात इसमाचा विहिरीत पडून मृत्यू

Next

वाडेगाव (जि. अकोला) : येथील शिक्षक कॉलनीतील कठडा नसलेल्या विहिरीत पडण्यापासून बकरीला वाचविण्यासाठी गेलेल्या बकरी मालकाचा १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी बकरीसोबतच विहिरीत पडून मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीचे ६५ वर्षे वयाचे सेवानवृत्त कर्मचारी रामप्रसाद किसन लोध हे शनिवारी त्यांच्या बकर्‍या चारण्यासाठी पातूर-बाळापूर मार्गालगतच्या शिवारात गेले होते. तेथून सायंकाळच्या सुमारास घरी परत येत असताना एक बकरी भटकून इतरत्र फिरत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सदर बकरीला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न चालविला होता. बकरी गावातीलच मानकर यांच्या खुल्या प्लॉटमधील कठडा नसलेल्या विहिरीजवळ होती. सदर भूखंड शिक्षक कॉलनी वसाहतीजवळ आहे. त्या विहिरीत पडण्यापासून बकरी वाचविण्याचा प्रयत्न रामप्रसाद लोध यांनी केला.परंतु,दुर्दैवाने ते बकरीसह विहिरीत कोसळले. त्यातच त्यांचा व बकरीचा अंत झाला. गावकर्‍यांनी अरुंद असलेल्या या विहिरीतून दोराच्या साहाय्याने रामप्रसाद लोध यांचे पार्थिव बाहेर काढले. सदर विहीर ही नागरी वस्तीजवळ असल्याने धोकादायक आहे. ती पूर्णपणे बुजविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. हे वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी कसलीही कार्यवाही केली नव्हती.

Web Title: In an attempt to save the goat, its wellness drowned in death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.