अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा प्रयत्न, आई-वडिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:15 AM2021-06-03T04:15:02+5:302021-06-03T04:15:02+5:30
१७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिला १८ वर्षांची एक बहीण आहे. तिचे आणि तिच्या बहिणीचे मनाविरुद्ध गावातील परंतु पुण्यात ...
१७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिला १८ वर्षांची एक बहीण आहे. तिचे आणि तिच्या बहिणीचे मनाविरुद्ध गावातील परंतु पुण्यात नोकरी करणाऱ्या दोन युवकांसोबत २१ मे रोजी तिच्या आई-वडिलांनी लग्न लावून दिले. दोन्ही मुली लग्न करण्यास तयार नव्हत्या. त्यांनी लग्न करण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांचे बळजबरीने लग्न लावण्यात आले. लग्नानंतर पुण्याला गेल्यावर युवकांनी त्यांच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे मुली मानसिक दडपणात आल्या. त्यांनी बाळापूर येथे येऊन २ जून रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात आई-वडील व सासू, सासरे यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार व पती मोहन राजेश तायडे, शंकर राजेश तायडे यांच्याविरुद्ध बळजबरीने लग्न करणे, लैंगिक शोषण करणे भादंवि कलम ३७६,(२), पोस्को नुसार गुन्हा दाखल केला.