अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:01 AM2017-12-13T03:01:26+5:302017-12-13T03:03:39+5:30

अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील एकवीरा ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे महिला व युवकांना दिसल्यानंतर त्यांनी दगडफेक करताच चोरटे पळून गेले. ही घटना सोमवारच्या रात्री घडली. 

Attempts to break the bullion shop in Akola's Biggest Area! | अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न!

अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न!

Next
ठळक मुद्देएकवीरा ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्ननागरिकांनी दगडफेक करताच चोरटे पळून गेले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सौभाग्य ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी तीन किलो चांदी चोरून नेल्यानंतर या चोरट्यांनी अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील एकवीरा ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे महिला व युवकांना दिसल्यानंतर त्यांनी दगडफेक करताच चोरटे पळून गेले. ही घटना सोमवारच्या रात्री घडली. 
वाडेगाव येथील सौभाग्य ज्वेलर्स चोरट्यांनी रात्री २ वाजताच्या सुमारास फोडले. त्यातून चोरट्यांनी तीन किलो चांदी चोरून नेली. त्यानंतर त्यांनी अकोल्यातील मोठी उमरी येथील एकवीरा ज्वेलर्सकडे मोर्चा वळवला. चोरट्यांनी ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र दुकानाच्या शेजारी राहणारे विष्णू चोरे यांना दुकानाचे शटर तोडण्याचा आवाज आल्याने त्यांनी दुकान मालक तळोकार यांना फोन लावून बोलावून घेतले; मात्र चोरटे पळून गेले. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला; मात्र चोरटे त्यांच्या हाती लागले नाहीत.

Web Title: Attempts to break the bullion shop in Akola's Biggest Area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.