वाहकाकडील तिकिटांचे पैसे लंपास करण्याचा प्रयत्न

By admin | Published: September 20, 2016 01:34 AM2016-09-20T01:34:20+5:302016-09-20T01:34:20+5:30

अकोला बस स्थानकावरील प्रकार; आरोपीला रंगेहात पकडले!

Attempts to cash in on vehicle ticket | वाहकाकडील तिकिटांचे पैसे लंपास करण्याचा प्रयत्न

वाहकाकडील तिकिटांचे पैसे लंपास करण्याचा प्रयत्न

Next

अकोला, दि. १९- एसटी वाहकाकडील तिकिटांचे पैसे लंपास करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
एसटी वाहक आनंद गोपाल पिल्ले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी ते बसस्थानक डेपोमध्ये जेवण करीत होते. त्यांच्या शर्टाच्या खिशात तिकिटांची ६ हजार ३८६ रुपये रोख होती. जेवण करण्यापूर्वी पिल्ले यांनी शर्ट भिंतीवरील खुंटीला टांगले आणि जेवायला बसले. तेवढय़ामध्ये अमरावती शहरातील आझादनगरात राहणारा आरोपी शेख रोशन शेख इमाम याने एसटी वाहक पिल्ले यांची नजर चुकविण्याचा प्रयत्न केला आणि खिशातील रोख अलगद काढू घेण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु चोरट्याच्या कृत्याकडे पिल्ले यांचे लक्ष गेल्यावर त्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी शेख रोशन हा पळून जाऊ लागला. दरम्यान, पिल्ले यांनी त्यांच्या सहकारी कर्मचार्‍यांना आवाज दिला. सर्वांनी मिळून आरोपी रोशनला पकडले आणि पोलीस चौकीत आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सिव्हिल लाइन पोलिसांच्या ताब्यात दिले. पिल्ले यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी शेख रोशन याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७९, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

Web Title: Attempts to cash in on vehicle ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.