‘एटीएम‘ पळविण्याचा प्रयत्न फसला !

By admin | Published: January 30, 2017 03:24 AM2017-01-30T03:24:47+5:302017-01-30T03:24:47+5:30

अकोल्यातील घटना: लॉकर न उघडल्याने मशीनच उचलली!

Attempts to flee 'ATM' were unsuccessful! | ‘एटीएम‘ पळविण्याचा प्रयत्न फसला !

‘एटीएम‘ पळविण्याचा प्रयत्न फसला !

Next

सायखेड (जि. अकोला), दि. २९- ह्यएटीएमह्णचे लॉकर न उघडल्याने चोरट्यांनी अख्खी मशीनच लंपास करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २५ जानेवारीच्या मध्यरात्री बाश्रीटाकळी तालुक्यातील धाबा येथे घडली. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मुख्य चौकात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
२५ जानेवारीच्या मध्यरात्री धाबा स्टेट बँकेशेजारी व ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या एटीएम केंद्राचे लोखंडी कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सीसी कॅमेर्‍यावर काळी पट्टी लावून मशीनचे लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. मशीनचे काही भाग तोडले; परंतु रोकड काढता येत नसल्याने चोरट्यांनी अख्खी मशीनच ओढत तोडलेल्या शटरजवळ आणली. पाच क्विंटल वजन असलेली एटीएम मशीन उलचून नेणे शक्य न झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. घटनेची माहीती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु चोरट्यांचा शोध लागला नाही.

Web Title: Attempts to flee 'ATM' were unsuccessful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.