स्वच्छ सर्वेक्षण होईपर्यंत मुख्यालयात हजर रहा - नगर विकास विभागाचे महापालिका आयुक्तांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 06:14 PM2019-01-09T18:14:25+5:302019-01-09T18:14:52+5:30

अकोला:केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत महापालिका, नगर परिषद तसेच नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामाचे मुल्यमापन सुरु झाले आहे. केंद्राच्या क्यूसीआय(क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)मार्फत शहरांची तपासणी केली जात असून जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यभरातील महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश नगर विकास विभागाने जारी केले आहेत.

To attend the headquarters till the clean survey | स्वच्छ सर्वेक्षण होईपर्यंत मुख्यालयात हजर रहा - नगर विकास विभागाचे महापालिका आयुक्तांना निर्देश

स्वच्छ सर्वेक्षण होईपर्यंत मुख्यालयात हजर रहा - नगर विकास विभागाचे महापालिका आयुक्तांना निर्देश

Next

अकोला:केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत महापालिका, नगर परिषद तसेच नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामाचे मुल्यमापन सुरु झाले आहे. केंद्राच्या क्यूसीआय(क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)मार्फत शहरांची तपासणी केली जात असून जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यभरातील महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश नगर विकास विभागाने जारी केले आहेत.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानची अंमलबजावणी ‘मिशन मोड’पध्दतीने सुरु आहे. राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत अंमलबजाणी केली जात आहे. या अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगर पालिकांचे मुल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित असून त्यानुसार केले जात आहे. त्यामुळे संबंधित स्वायत्त संस्थांनी सर्वेक्षणाच्या संपूर्ण कालावधीत मुल्यमापनाच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी परिपूर्ण तयारी करण्याची गरज आहे. यावर प्रत्यक्षात नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त, मुख्याधिकाºयांनी मुख्यालयात हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश नगर विकास विभागाने जारी केले आहेत.

सर्वेक्षणात विदर्भाचे रॅकिंग घसरले!
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अ‍ॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत. ४ जानेवारीपासून केंद्राच्या क्यूसीआय(क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीला प्रारंभ केला असता विदभार्तील जिल्ह्यांमधील अकरा शहरांना पहिल्या शंभर क्रमांकात स्थान नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अकोला महापालिका २९५ व्या स्थानावर असून अमरावती महापालिक ा १३० व्या स्थानावर आहे.

Web Title: To attend the headquarters till the clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.