शाळा, महाविद्यालयांमध्ये केवळ ८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:26+5:302020-12-14T04:32:26+5:30
एकूण विद्यार्थी १,०६,१७१ शिक्षक/कर्मचारी ५,८६० विद्यार्थी उपस्थिती ९,२३१ पालकांसोबत शिक्षकांनाही ...
एकूण विद्यार्थी १,०६,१७१
शिक्षक/कर्मचारी ५,८६०
विद्यार्थी उपस्थिती ९,२३१
पालकांसोबत शिक्षकांनाही धास्ती!
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मृत्यूसुद्धा होत आहेत. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नाहीत. पालकच नव्हे तर शिक्षकांचीसुद्धा हीच भूमिका आहे. कारण चाचणीदरम्यान आतापर्यंत ४० शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शिक्षकही सध्या शाळा नकोच, अशी भूमिका घेत आहेत. शाळेत जाण्याऐवजी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्याकडेच शिक्षकांचा कल दिसत आहे.
कोरोनामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत येण्याविषयी सक्ती केलेली नाही. त्यांची इच्छा असेल तर विद्याथ्यार्थ्यांनी शाळेत यावे; परंतु विद्यार्थी, शिक्षकांनी शाळेत योग्य खबरदारी घ्यावी. उपाययोजना कराव्यात.
प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक