गतिमंद चिमुकलयांच्या ' प्रामाणिक लाकुडतोड्या' ला प्रेक्षकांची मानमुराद दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 09:24 PM2019-12-18T21:24:58+5:302019-12-18T21:25:31+5:30
विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेला प्रारंभ 32 नाटकांचे होणार सदरीकरण
- नीलिमा शिंगणे-जगड अकोला: विश्वास करंडक बाल नाटय स्पर्धेला बुधवारी प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आठ नाटक सादर करण्यात आली. यामध्ये इंद्रायणी मतीमंद मुलांची शाळा संघाने सादर केलेल्या ‘प्रामाणिक लाकुडतोडया’ नाटकाला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. चार दिवस चालणाºया या स्पर्धेत एकुण ३२ नाटक सादर होणार आहेत. स्पर्धेचा शुभारंभ अकोला येथील सुफ्फा इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या ‘हरविलेले बालपण’या नाटकाने झाला. ‘आईचे काळीज’ सन्मित्र पब्लिक स्कुलने सादर केले.‘सृष्टी इच्छामरण मागते तेंव्हा’हे नाटक श्री समर्थ पब्लिक स्कुल रिधोराने सादर केले. ‘तमाशा’ नाटक श्री संताजी इंग्लीश स्कुल अकोला संघाने सादर केले. तर जानकीबाई चौधरी डिजिटल इंग्लीश स्कुलने ‘मोबाईल आणि त्याचे दुष्परिणाम’नाटक सादर केले. स्कुल आॅफ स्कॉलर्सने ‘चम चम चमको’नाटकाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. ‘सच्चा मित्र’नाटक ज्युबिली इंग्लीश प्रायमरी स्कुलने सादर केले. तर आजच्या दिवसाचा शेवट ‘प्रामाणिक लाकुडतोडया’ नाटकाने झाला. आठही नाटकांमध्ये बालकलावंतानी आपल्या उत्कृष्ट कलागुणांनी प्रैक्षकांना मंत्रमुग्ध केले. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन मागीलवर्षी या स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक पटकाविणारे बालकलावंत सोहम बोरकर व गौरी पुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.मधु जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून स्पर्धेचे परिक्षक गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे, स्पर्धेचे निमंत्रक प्रशांत गावंडे व प्रदीप खाडे उपस्थित होते. स्पर्धेच्या प्रारंभी नटसम्राट ज्येष्ठ नाटय व सिनेकलावंत डॉ. श्रीराम लागु यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रा.जाधव यांनी डॉ. लागू यांच्या जीवनकाव्याची माहिती दिली. यानंतर जे.आर.डी.टाटा स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायिले. प्रास्ताविक प्रशांत गावंडे यांनी केले. ही बालनाटय स्पर्धा आता केवळ स्पर्धा राहिली नसून, बालनाटय महोत्सवाचे स्वरू प प्राप्त केले आहे, असे गावंडे म्हणाले. जाधव यांनी आपल्या भाषणात, हा नाटय महोत्सव अधिक मोठया स्वरू पात वर्षानुवर्ष चालतच रहावा. याद्वारे नविन नाटय कलावंत उदयास यावेत, असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाला डॉ. सुनील गजरे, अनिल कुळकर्णी, बी.एस.देशमुख, विजय कौसल, प्रतिभा फोकमारे, अमोल सावंत, मोहम्मद फजल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन तनुश्री वक्टे व मृण्मयी कुरू डे यांनी केले. आभार स्रेहल गावंडे हिने मान