मुलाच्या मदतीने काकूने केली पुतण्याची हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:32+5:302021-03-19T04:17:32+5:30
चंदन रामकरण केवट यांच्या तक्रारीनुसार आरोपी विशाल मुनीलाल केवट(२८) रा. कापशी रोड, चौफुलाबाई मुनीलाल केवट(५०) वर्ष यांच्यामध्ये शेतीबद्दल वाद ...
चंदन रामकरण केवट यांच्या तक्रारीनुसार आरोपी विशाल मुनीलाल केवट(२८) रा. कापशी रोड, चौफुलाबाई मुनीलाल केवट(५०) वर्ष यांच्यामध्ये शेतीबद्दल वाद सुरू होता. सदर प्रकरण दिवाणी कोर्टात न्यायप्रविष्ट होते. या शेतीपैकी काही शेती हायवे नंबर १६१ या महामार्ग चौपदरीकरणासाठी शासनाने अधिग्रहित केली आहे. त्या शेतीचा मोबदला म्हणून दोन कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले होते. त्यासंदर्भात दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. शेतीच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून १७ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास चंदन केवट यांचा भाऊ बंटी रामकरण केवट व आरोपी विशाल मुन्नीलाल केवट व चौफुलाबाई मुन्नीलाल केवट यांच्यात वाद झाला. आरोपींनी बंटी रामकरण केवट यास शिवीगाळ करून जबर मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बंटी केवट याला कुटुंबीयांनी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी बंटी रामकरण केवट यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीनुसार गुरुवारी सकाळी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ५०४(३४) नुसार गुन्हा दाखल करून आरोपी विशाल मुन्नीलाल केवट व चौफुलाबाई मुन्नीलाल केवट यांना अटक केली. पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय आव्हाळे पातुरात दाखल झाले असून, ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर इंगळे, अरविंद पवार, दिलीप मोडक, निलेश राठोड आदी तपास करीत आहेत.
शेतीच्या रकमेवरून सुरू होता वाद
महामार्गासाठी शासनाने केवट कुटुंबीयांची शेती अधिग्रहित केली. शासनाने त्यांना अधिग्रहित शेतीसाठी २ कोटी ४० लाख रुपये मोबदला मंजूर केला. त्यामुळे शेतीच्या पैशांतून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू झाले. आरोपी विशाल केवट व काकू चौफुलाबाई केवट हे चंदन केवट व त्याचा भाऊ बंटी केवट यांना पैशांमध्ये वाटा मागत होते. यातूनच बंटी केवट याची हत्या करण्यात आली.