ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 10:44 AM2020-04-12T10:44:24+5:302020-04-12T10:44:42+5:30

. संचारबंदी काळात दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे ऑटो चालक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

Autorickshaw wheels stop, drivers question livelihoods! | ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न!

ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत २२ दिवसांपासून संचारबंदी आहे. या काळात रेल्वे, बसगाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवाशीच नसल्यामुळे ऑटोरिक्षांची चाकेसुद्धा थांबली आहेत. पोलीस वाहतूक शाखेच्या माहितीनुसार शहरात ४ हजारांवर परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. सध्या शहरातील रस्त्यांवर एकही ऑटोरिक्षा धावत नसल्याने, ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. संचारबंदी काळात दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे ऑटो चालक आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. शासनाने २२ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरिकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे रेल्वे, बससेवासुद्धा बंद आहे. गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, या दृष्टिकोनातून रेल्वे व परिवहन विभागाला सेवा बंद ठेवाव्या लागत आहेत.
रेल्वे स्थानक, बसस्थानकावर प्रवासी नसल्यामुळे आणि नागरिकांचे बाहेर पडणे बंद असल्याने, ऑटोरिक्षांची चाकेसुद्धा थांबली आहेत. एक ऑटोरिक्षा चालकाला दररोज ५00 ते ८00 रुपये रोजगार मिळायचा. यातून मुलांचेशिक्षण, घरखर्च भागायचा; परंतु आता हा रोजगारच बुडाला असल्याने आणि उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे ऑटोरिक्षा चालकांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, याची चिंता आॅटोरिक्षा चालकांना सतावत आहे. कोरोनामुळे ऑटोरिक्षा चालकांना चांगलाच फटका बसला आहे. गत २२ दिवसांपासून घरांसमोर आॅटोरिक्षा उभ्या आहेत. घरात दुसरे कोणी कमावणारे नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची मोठी आबाळ होत आहे. अशा संकटकाळात करावे काय, असा प्रश्न आॅटोरिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनाने परवानाधारक आॅटोरिक्षा चालकांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आॅटोरिक्षा चालकांनी केली आहे.  

शाळा बंद तर ऑटो बंद!
अकोला शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे सातशेच्यावर आॅटोरिक्षा चालक आहेत; परंतु शाळा, महाविद्यालयांना अचानक सुट्या देण्यात आल्यामुळे या ऑटोरिक्षा चालकांसमोरसुद्धा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व चालकांचे  ऑटो घरासमोर उभे राहिल्याने महिन्याकाठी ८ ते १0 हजार रुपये येणारा रोजगार बंद झाला आहे.

कोरोनाच्या संचारबंदीमुळे आम्हा ऑटोरिक्षा चालकांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याचा प्रश्न आहे. ४ हजारांवर कुटुंबांचा ऑटोरिक्षाच्या भरवशावर संसार चालतो. पैसाच नसल्यामुळे घर कसे चालवावे, याची चिंता आहे. यातून प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा.
-उमेशचंद्र शर्मा,
अध्यक्ष, शहर ऑटोरिक्षा चालक संघटना.

Web Title: Autorickshaw wheels stop, drivers question livelihoods!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.