हरभऱ्याला सर्वसाधारण ४,८५० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:51+5:302021-05-09T04:18:51+5:30
अकोला : यावर्षी बाजार समितीत हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे. शनिवारी हरभऱ्याला ४ हजार ८५० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. ...
अकोला : यावर्षी बाजार समितीत हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे. शनिवारी हरभऱ्याला ४ हजार ८५० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. कमीत कमी ४ हजार ४००, जास्तीत जास्त ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजार समितीत १४२० क्विंटल आवक झाली होती.
----------------------------------------------------------
शेतकऱ्यांना बियाण्यांची चिंता
अकोला : शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या बियाण्यांची चिंता सतावत आहे. यंदा बियाण्यांचे भाव दुपटीने वाढले असून, शेतीचा लागवड खर्चही वाढत आहे. त्यातुलनेत शेतमालाला बाजारभाव मिळालेला नाही. नियोजनासाठी कसरत होत आहे.
------------------------------------------------------------
शेतकऱ्यांना सतावतेय पीक कर्जाची चिंता
अकोला : राज्य शासनाने कर्जमाफीचे धोरण जाहीर केले; मात्र त्याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येत आहेत. अशातच खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांना नव्या पीक कर्जाची चिंता सतावत आहे. शासनस्तरावरून तत्काळ राष्ट्रीयीकृत बँकांना निर्देश दिले जावे, अशी मागणी होत आहे.
------------------------------------------------------------