तुरीला सर्वसाधारण ६,७०० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:19 AM2021-05-08T04:19:08+5:302021-05-08T04:19:08+5:30
अकोला : बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली आहे. शुक्रवारी ६२५ क्विंटल आवक झाली होती. तुरीला कमीत कमी ६ ...
अकोला : बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली आहे. शुक्रवारी ६२५ क्विंटल आवक झाली होती. तुरीला कमीत कमी ६ हजार ४००, जास्तीत जास्त ७ हजार तर सर्वसाधारण ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
-----------------------------------------------
तापमानात घट ; पारा ४०. ८ अंश सेल्सिअस
अकोला : सलग तीन दिवस उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली. जिल्ह्यात ४०. ८ अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली. आठवडाभरापासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
-------------------------------------------------
प्लाझ्माबाबत वाढतेय जनजागृती
अकोला : कोरोनाबाधित रुग्णाला प्लाझ्मा दिल्यानंतर तो रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्माबाबत जनजागृती सुरू आहे. याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसादसुद्धा देण्यात येत आहे. अनेकजण स्वत:हून प्लाझ्मा दान करीत आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------------------------------------