वऱ्हाडात सरासरी ११७ टक्के पाऊस; तीन जिल्हे कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 06:53 PM2018-06-22T18:53:43+5:302018-06-22T18:53:43+5:30
अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ११७.४ टक्के पाऊस झाला आहे. तीन जिल्हे कोरडे असताना हा पाऊस सरासरीच्या ११ टक्के जास्त आहे.
अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ११७.४ टक्के पाऊस झाला आहे. तीन जिल्हे कोरडे असताना हा पाऊस सरासरीच्या ११ टक्के जास्त आहे. या पाच जिल्ह्यात सर्वाधिक २०१.४ मि.मी. पावसाची नोंद वाशिम जिल्ह्यात झाली आहे.
पश्चिम विदर्भात याहीवर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दीर्घ दडी मारली असून,अद्याप मान्सूनची सुरुवात झाली नाही; पण मान्सूनपूर्व पाऊस मात्र १ जून आणि २० व २१ जून रोजी काही जिल्ह्यात बऱ्यापैकी झाला. वºहाडातील या पाच जिल्ह्यात २१ जूनपर्यंत सरासरी १०६. ८ मि.मी. पाऊस हवा होता. प्रत्यक्षात ११७.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्याची स्थिती बघितल्यास आतापर्यंत सरासरी ९४.६ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ११५. २ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी ११४.८ मि.मी.पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ११५.२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ९९.३ मि.मी.नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात १२३.१ मि.मी. पाऊस आतापर्यंत अपेक्षित होता. प्रत्यक्षात १२९.७ मि.मी.तर अमरावती जिल्ह्यात सरासरी १०२.२ मि.मी.पाऊस अपेक्षित होता आजमितीस ९९.१ पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, वºहाडात पाऊस कमी असला तरी वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पावसाची सरासरी वाढली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, जिथे ७५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला तेथे पेरण्यांची तयारी शेतकºयांनी सुरू केली आहे. बियाणे बाजारातही शेतकºयांची गर्दी वाढली आहे; पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याने वºहाडातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.