विदर्भात सरासरी पावसात तफावतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 08:03 PM2017-07-30T20:03:10+5:302017-07-30T20:03:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यात १ जून ते ३० जुलैपर्यंत पडणाºया एकूण पावसापैकी बहुतांश जिल्ह्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याची तीव्रता परभणी जिल्ह्यात अधिक असून, येथे सामान्यपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद नागपूरच्या हवामानशास्त्र विभागाने केली आहे.
विदर्भात १६ जून रोजी मान्सूनच्या पावसाने प्रवेश केला आहे; परंतु अचानक दडी मारल्याने जून-जुलै महिन्यात पडणाºया पावसाची सरासरी घसरली आहे. दरम्यान, १ जूून ते ३० जुलैपर्यंत विदर्भातील नागपूर जिल्ह्यात सामान्यपेक्षा १८ मि.मी. कमी पाऊस झाला आहे. अमरावती जिल्ह्यात सरासरी २३ मि.मी. पाऊस कमी आहे. यवतमाळ जिल्ह्यात २४ मि.मी., भंडारा २३ मि.मी., गोंदिया येथे २५मि.मी., हिंगोली येथे मि.मी. पाऊस कमी आहे. नांदेड येथे २२ मि.मी.,जालना २५ मि.मी. तर औरंगाबाद जिल्ह्यात २३ मि.मी. पावसाची कमतरता आहे. अकोला येथे सामान्यपेक्षा १९ मि.मी, नागपूर १८ मि.मी.,चंद्रपूर १९ मि.मी.,लातूर येथे १६ मि.मी.,उस्मानाबाद येथे८ मि.मी. मुंबई शहरात १५ मि.मी. पाऊस सामान्य पावसापेक्षा कमी आहे. रायगड येथे १८ मि.मी.,सातारा १४ मि.मी., सिंधुदुर्ग येथे ११ मि.मी., जळगावला १३ मि.मी., धुळे १४ मि.मी., नंदुरबार येथे ११ मि.मी., वाशिम येथे ६ तर बीड येथे सरासरी ५ मि.मी. पावसाची तफावत आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अकोला येथे २.१ मि.मी., बुलडाणा २.० मि.मी., चंद्रपूर २.० मि.मी.,वर्धा येथे ०.४ तर वाशिम येथे १.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.